Site icon e लोकहित | Marathi News

राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 15 हजार शाळा होणार बंद

Big decision of the state government! 15 thousand schools in the state will be closed

मुंबई : राज्यातील दुर्गम विद्यार्थी (students) व शिक्षकांसाठी (Teacher) एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्याभरतील २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 राज्यात शाळा बंद होणार आहेत.

Disha Vakani: मोठी बातमी! ‘तारक मेहता’ फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर

सरकारने शाळांबाबत माहिती देखील मागवली होती त्यामध्ये असे आढळून आले की पटसंख्या 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा मुख्यत: ग्रामीण, दुर्गम भागात जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे परत जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत या शाळांमधील विद्यार्थिसंख्येचा आढावा घेण्यात आला. यानुसार राज्यातील 14 हजार 985 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Siddharth-Kiara: ठरलं! सिद्धार्थ-कियारा ‘या’ दिवशी करणार लग्न? तारीख आली समोर

त्यामुळे राज्य सरकार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत. शासनाच्या या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. याला विरोध दर्शवत शिक्षकांनी देखील ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, शेतकर्‍यांची मुले कायमची शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाने सोयबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान, बळीराजा चिंतेत

Spread the love
Exit mobile version