मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पॉलिटेक्निकच्या शिक्षणासंदर्भात मोठी घोषणा केली. डिसेंबरच्या शेवटपर्यंत अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची सर्व पुस्तके मराठीत उपलब्ध हाेणार असल्याची घाेषणा चंद्रकांत पाटील केली. नाशिक (Nashik) येथे काल लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च (Engineering Talent Search) स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभार झाला त्यावेळी ते बोलत होते.
Taimur Khan: बापरे! तैमूर खानला सांभाळणाऱ्या आयाला मिळतो ‘इतका’ पगार? ऐकून व्हाल थक्क
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लवकरच सर्व विद्यार्थ्यांना मराठी (Marathi) भाषेमध्ये पुस्तक उपलब्ध करून देण्यात येतील. शिक्षकांनी जरी इंग्रजीतून शिकवले तरी विद्यार्थ्यांना ते मराठीतून समजणार असल्याने ही पद्धत जास्त सोपी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, इंजिनियरिंगसाठी जर ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासमोर प्रश्न उभा राहतो प्रवेश घेऊ का नको. पण आता पुस्तके मराठीतून मिळाली तर विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होणार आहे.
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना लिहिलेले शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र होतेय व्हायरल
मराठी अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्क्कीच फायदा होईल अशी अशा देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकासही झाला पाहिजे त्यासाठी विद्यापीठानं स्किल डेव्हलपमेंटचे विषय घ्यावेत अशा सूचना देखील चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
कैद्यांसाठी आनंदाची बातमी! आता कारागारगृहातही ठेवता येणार शारीरिक संबंध