
मुंबई : पशुंना होणाऱ्या लम्पी रोगाने (Lumpy disease) राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक जनावरे (animals) दगावली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या लम्पी आजारामुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे आहेत. त्या शेतकरी आणि पशुपालकांना (herdsmen)16 ते 30 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य (Financial assistance) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला गुलाबी साडीत पाहून चाहते थक्क! पाहा PHOTO
तसेच ओढकाम करणारी जनावरे म्हणजेच बैल यासाठी प्रति जनावर 25 हजार रुपये तीन जनावरांपर्यंत आणि वासरांसाठी 16 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ओढकाम करणाऱ्या तीन लहान जनावरांपर्यंत ही मदत दिली जाईल. एवढच नव्हे तर शासनाने लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील सुमारे 1,500 रीक्त पदे तातडीने तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर भरण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यात पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहेत.
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितला गुलाबी साडीत पाहून चाहते थक्क! पाहा PHOTO
मग यामध्ये पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 293 पदांची भरती तर पशुधन पर्यवेक्षकांची 1159 पदे भरली जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की, कंत्राटी अधिकाऱ्यांना महिना 50,000 रुपये ठोक मानधन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षकांना महिना 15 हजार रुपये मानधन देण्यात येईल. केवळ 11 महिन्यांसाठी ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Jayant Patil: जयंत पाटलांनी राज ठाकरेंना दिला सल्ला, म्हणाले, “स्वत:चा पक्ष वाढवावा”