झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! केवळ अडीच लाख रुपयांमध्ये मिळणार घर

Big decision of the state government for slum dwellers! A house will be available for only two and a half lakh rupees

मुंबईमधील झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने मुंबईमधील झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा दिला आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील मुंबईमधील झोपडपट्टी धारकांना आता फक्त अडीच लाख रुपयांमध्ये घर मिळणार आहे. राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत जानेवारी २००० ते जानेवारी २०११ या काळातील झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईमधील झोपडपट्टीच्या बदल्यात आता झोपडपट्टी धारकांना सशुल्क घर मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो झोपडपट्टी धारकांना फायदा होणार आहे.

फायनलआधीच चेन्नईच्या ‘या’ बड्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, “मला समोर मुंबईची टीम नकोय”

या निर्णयाबाबत राज्य सरकारने परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्या परिपत्रकानुसार, मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांच्या झोपडपट्टीच्या बदल्यात केवळ दोन लाख पन्नास हजार रुपयांमध्ये घर मिळणार आहे. शासनाने पुनर्वसन सदनाची किंमत अडीच लाख रुपये एवढी निश्चित केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लाखो लोकांना स्वतःच्या घरात राहण्याच्या इच्छेला पाठबळ मिळालं आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढला असून त्या जागेचा देखील विकास होणार आहे.

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीचा भीषण अपघात, पाच लोकांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार, या नवीन योजनेतील लाभार्थी झोपडपट्टी धारकांच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्याची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. आगामी काही दिवसांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिका आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकार मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महापालिकांसाठी मोठमोठे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आगामी निवडणुकांसाठी ही योजना गेमचेंजर ठरू शकते.

Murder | प्रेयसीच्या छातीत, पोटात चाकूने वार केले… शरीराचे तुकडे केले आणि त्यानंतर केलेले कृत्य वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *