राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती

Big decision of the state government, recruitment of 75 thousand posts for various posts including Police-Talathi

केंद्र सरकार (Central government) आणि राज्य सरकार नेहमी वेगवेगळ्या पदांच्या भरती (Recruitment of posts)करत असतात. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या(MVA) काळात बऱ्याच पदांची भरती रखडली होती.यामध्ये राज्याच्या 29 शासकीय विभाग(Govt Department) आणि जिल्हा परिषद जवळपास पावणेतीन लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने(Shinde-Fadanvis government) 75,000 पदांच्या भरतीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान यामध्ये पोलिस, तलाठी, आरोग्य, जलसंपदा, कृषी यासह जिल्हा परिषदांमधील पदांची भरती होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत घेण्याचे नियोजन केले आहे.

भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला, किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

राज्याच्या विविध जिल्हा परिषदेत आणि 9 शासकीय विभागात मंजूर पदांची संख्या तब्बल 10,70,840 एवढी आहे. दरम्यान त्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सव्वादोन लाख, तर जिल्हा परिषदेच्या 65,000 पदे रिक्त आहेत. म्हणून शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे कठीण झाले आहे कारण शासकीय पदेच रिक्त आहेत. मागील साडेसहा वर्षांत ही पदभरती झाली नाही. आणि त्यातच कोरोना महामारीने दोन वर्ष संपूर्ण देशात थैमान घातलं. त्यामुळे वित्त विभागाने सगळ्याच पदांच्या भरतीवर निर्बंध घातले होते. दरम्यान आता वित्त विभागाने निर्बंध उठवले आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुन्हा होणार दिवाळी, कारण कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतय ‘हे’ गिफ्ट

राज्य सरकारने लोकहिताचे निर्णय घेत शेतकरी, तरुण आणि हातावर पोट असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान याच पार्श्‍वभूमीवर 75,000 रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. तसेच आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.

लग्नात रसगुल्ल्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू तर दहा जण जखमी

विभाग मंजूर अंदाजित रिक्त पदे

गृह विभाग – 2,92,820 50,851

सार्वजनिक आरोग्य – 62,358 26,712

जलसंपदा – 45,217 23,489

वैद्यकीय शिक्षण – 36,956 14,423

महसूल व वन विभाग – 69,584 13,557

उच्च व तंत्र विभाग – 12,407 4,395

वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये – 36,956 13,423

आदिवासी विकास विभाग – 21,154 6,813

सार्वजनिक बांधकाम – 21,649 9,751

‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पाच वर्षात जमा होईल 14 लाखांचा निधी; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *