Site icon e लोकहित | Marathi News

राज्य सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सुरू करणार ज्युनिअर-सिनिअर केजीचे वर्ग

Big decision of the state government, Zilla Parishad to start junior-senior KG classes to increase the number of schools

मुंबई : जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळांबाबत राज्य सरकारने (State government) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या मोठ्या प्रमाणात खालवली आहे. नुसती पटसंख्या खलावलीच नाही तर अनेक जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांआभावी (Student) टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग (Classes of Junior and Senior KG) सुरु होणार केले जाणार आहेत.

‘या’ योजनेअतंर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबास मिळते २ लाखांची मदत, येथे करा अर्ज

हे वर्ग सुरू करून जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद शाळेत ज्युनिअर आणि सिनिअर केजीच्या वर्गांच्या माध्यमातून आता गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

बापरे! तब्बल ३५० हून अधिक मुलींशी संजय दत्तचे होते शारीरिक संबंध, समोर आले धक्कादायक कारण

जवळपास 75 हजार जागांवर भरती होणार

तर दुसरीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक दिलासादायक बातमी आहे. काल गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. दरम्यान या बैठकीत राज्यात लवकरच विविध विभागांमध्ये एमपीएससीमार्फत भरती केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यभरात सरळसेवेच्या माध्यमातून जवळपास 75 हजार जागांवर भरती केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे लागणार नाहीत

महत्वाची बाब म्हणजे ही सर्व पदे टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांमार्फत भरली जाणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाचा हा निर्णय खूप दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयामुळे रोजगारात देखील वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी

Spread the love
Exit mobile version