मुंबई : गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये महिला विवाहित असो किंवा अविवाहित जर तिला तिच्या संमतीने गर्भधारणा झाली तर सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ज्या महिला अविवाहित आहेत त्यांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणं असंवैधानिक असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
एलपीजी ग्राहकांनो सावधान! आता वर्षभरात केवळ 15 तर महिन्याला फक्त 2 सिलेंडर मिळणार
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, “ गर्भपाताचा सर्व महिलांना अधिकार आहे. २०२१ च्या गर्भपाताच्या कायद्यात विवाहित किंवा अविवाहित महिला असा फरक केलेला नाही. जर या कायद्यातील ३ ब (क) ही तरतूद फक्त विवाहित महिलांसाठी असेल, तर त्यामुळे फक्त विवाहित महिलांना लैंगिक संबंधांचा अधिकार आहे असा पूर्वग्रह होईल.”
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; वाचा सविस्तर