राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मागील एक आठवड्यापासून एकनाथ खडसे यांचा फोन नॉच रिचेबल आहे. त्यांच्यासोबत कसलाच संपर्क होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड!
सामान्य कार्यकर्ते व मतदारांसाठी कायम उपलब्ध असणारे एकनाथ खडसे ( Eknath Khdse) अचानक गायब झाल्याने कार्यकर्ते चिंतेत आहेत. मागील पाच-सहा दिवसांत खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉच रिचेबल आहेत.
दरम्यान, एकनाथ खडसे मुंबई ( Mumbai) मध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतु, कॉलवर संपर्क होत नाही म्हणून कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत. कॉल नॉच रिचेबल असणारे नेते राजकारणात कशी उलथापालथ करतात हे याआधी सर्वांनीच पाहिले आहे.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना डावलले; आमंत्रण पत्रिकेत नावच नाही!
मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आपल्या पक्षावर (राष्ट्रवादी काँग्रेस) नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. 2020 मध्ये राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंना पक्षात चांगली संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारण काय गोंधळ होतोय. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आजही निर्णय नाहीच, ‘या’ तारखेला होणार सुनावणी