आगामी लोकसभा निवडणूकांच्या ( Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे 2024 ची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगत होत चालली आहे. दरम्यान भाजपने ( BJP) देशातील काही महत्त्वाच्या मतदार संघांमध्ये विशेष लक्ष घातले आहे. यामध्ये बारामती मतदार संघाचा विशेष समावेश आहे. यासाठी भाजप व शिंदे गटाकडून बारामती मतदार संघाला टार्गेट केले जात आहे.
आता चित्रपटातही गाणार अमृता फडणवीस, नवीन गाणं झालं रिलीज! पाहा VIDEO
राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला म्हणून बारामती मतदार संघ ओळखला जातो. अशातच 2024च्या लोकसभा निवडणूकांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती मतदार संघात मोठा धक्का बसला आहे. या मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकताच शिंदे गटात (बाळासाहेबांच्या शिवसेनेत) प्रवेश केला आहे.
टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/R3jX3ZvH8V
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 25, 2023
बारामती लोकसभा मतदारसंघातील करमाळा सोलापूर व इंदापूर तालुका येथील पदाधिकारी व कार्यकत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला आहे. तसेच या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.