राज्यात गोकुळ (Gokul) दूध संघ खूप लोकप्रिय आहे. अनेकजण या संघाचे दूध खरेदी करत असतात. हा संघ राज्यातील अमूल (Amul), चितळे (Chitale) यांसारख्या दूध संघांना सतत कडवी टक्कर देत असतो. गोकुळने आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. परंतु सध्या गोकुळच्या कारभारावर बोट उचलण्यात आले आहे. कारण गोकुळ ऑनलाइन पद्धतीचा वापर न करता दूध उत्पादकांना जुन्या पद्धतीने चिठ्ठी देत आहे. (Latest Marathi News)
संघाकडून सध्या सॅटेलाईट डेअरी (Satellite Dairy), कोअर नेटवर्क, सिक्स लेयर पॅकिंग असे अनेक प्रयोग राबवण्यात येत आहे. मात्र संघाच्या या कारभाराचा दूध उत्पादकांना खूप मोठा फटका सहन करावा लागत आहे. सध्या सर्वत्र आता ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात असताना गोकुळ जुनी पद्धत का वापरत आहे? यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. सध्या गोकुळकडून एकूण १४ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पुन्हा हादरला; बुलढाण्यात आठ जणांनी केला महिलेवर सामूहिक बलात्कार
संघाची मेसेज सुविधा अजूनही सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या काळात गोकुळ जुनी पद्धत वापरत असल्याने दूध उत्पादकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूध उत्पादकांकडून लवकरात लवकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
टोमॅटोने घेतला जीव! हातपाय बांधून शेतकऱ्याचे संपवले जीवन, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का