Sharad Pawar । पंढरपूर : लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता शिंदे गटाच्या नेत्यानं शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)
Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांनी केली शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!
मागील काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) सगळीकडे रागाने बोलत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक असावा. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागावले असले तरी अजित पवार यांचीच भूमिका योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नेतृत्व जगातले १२५ देश मानत असून देशात सुरु असलेले विकासाचे पर्व आणि आंतराराष्ट्रीय राजकारणातला दबदबा पाहून पवार साहेबांनी वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती,” असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमानंतर शहाजीबापू बोलत होते. “सध्या माढा लोकसभेत प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगळी भाषा वापरत आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेल. माढा लोकसभेत उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील, असा विश्वास शहाजीबापू यांनी व्यक्त केला आहे .
Lok Sabha Election । अजित पवारांना मोठा धक्का! जवळचा माणूस घड्याळ सोडून तुतारी वाजवणार