Maratha Reservation । मुंबई : अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण (Reservation of Maratha community) रखडले आहे. आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाकडून बऱ्याच वेळा आंदोलन करण्यात आले. परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द केले केल्याने सरकारविरोधात मराठा समाजात नाराजी पसरली आहे. अशातच आता शांततेत सुरु असणाऱ्या जालन्यातील लाठीहल्ल्याने हे आंदोलन पेटले आहे. (Jalana Protest)
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु असून आजचा उपोषणाचा नववा दिवस आहे. जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांनी भूमिका घेतली आहे. अशातच आता शासनस्तरावर मराठा आरक्षणासंदर्भातील मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
Crop Crisis । बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, वांग्याच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
मराठा कुणबी जात पडताळणी संदर्भात कामकाज सुरु करण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जात पडताळणी प्रमाणपत्राचं शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आरक्षणासाठी विधेयक येण्याची शक्यता आहे. जर विधेयकाबाबत एकमत झाले तर लगेच विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाणी शोधता येते का? यामध्ये कितपत सत्यता आहे? वाचा महत्वाची माहिती