दहावीच्या (10 class) विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नुकताच बारावीचा रिझल्ट (12th Result) जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी बारावीच्या रिझल्टमध्ये मुलींनीच बाजी मारली असून जवळपास 94 टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दहावीच्या रिझल्टकडे (10th Result) लागले आहे.
ब्रेकिंग! समृद्धी महामार्गावर रेलिंगला धडकून कारला भीषण आग; २ जणांचा होरपळून मृत्यू
यंदाच्या वर्षी बारावीचा रिझल्ट खूप लवकर लागला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा रिझल्ट ही लवकर लागला जाईल असा अंदाज बांधला जात आहे. यादरम्यान विद्यार्थी ही दहावीच्या बोर्डाच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत आहे. यादरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
Ajit Pawar | अजित पवारांनी थेट हॉटेल मालकाला उभे केले शॉवरखाली! कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
माध्यमातील वृत्तानुसार, 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये दहावीच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याच दहावीच्या परीक्षेचा निकाल आता जून महिन्यात लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 जून 2023 पर्यंत दहावी रिझल्ट लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.
IPL Final | आयपीएलच्या फायनल मॅचला पावसाची हजेरी! आता ‘या’ तारखेला होणार सामना