राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसांमध्ये विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यावेळी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. २६ जानेवारीनंतर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
मोठी बातमी! उजनीचे पाणी आजपासून शेतीला सुटणार
यामध्ये महत्वाची बाब म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी बारावी उत्तीर्ण महिलांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा गळती? आमदार खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
बैठकीमधील महत्त्वाचे निर्णय
1) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता.
2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेमधील प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे आदेश.
3) पोषण आहाराच्या दरात वाढ होणार
4) महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे अंगणवाडी वर्ग भरविण्याच्या सूचना
5) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार
“…अन्यथा आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता”; त्या प्रसंगातून अजित पवार थोडक्यात बचावले