आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये सामन्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी ( Agriculture sector) विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
पॅनकार्ड संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
‘हरित शेती’ ( Green Development) हे अर्थसंकल्प 2023-24 च्या सात महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक होते. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी वर्धन निधी सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. यामाध्यमातून शेतीशी संबंधीत स्टार्टअप्सना ( Startups) प्रोत्साहन दिले जाणार आहे.
सिगारेटही महागली, यंदाच्या बजेटमध्ये ‘या’ गोष्टी महागल्या; वाचा सविस्तर
यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 186 लाख कोटींची तरतूद १८६ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खालील घोषणा करण्यात आल्या आहेत.
1) फलोत्पादन वाढीवर भर देण्यात येणार.
2) पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी 20 लाख कोटींची तरतुद.
3) भरडधान्याच्या उत्पादन, विक्री व संशोधन वाढीसाठी उपाययोजना.
4)नाशवंत शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी देशात शीतगृह उभारणार.
5) कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करता यावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी 3 केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
हिरेही झाले स्वस्त पण सोने चांदी महागले! यंदाचा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर