शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. अशातच राजकीय नेत्यांचे इतर पक्षात होणाऱ्या प्रवेशाची संख्याही वाढली आहे. तर आगामी अधिवेशनाआधी शिवसेनेचा ठाकरे गट (Thackeray Group) वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता.
नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
आता यांनतर उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कामध्ये आहेत. सध्या त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. माढा तालुक्यातील टेंभूर्णीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवची ती पोस्ट चर्चेत; अशोक सराफ यांना ‘या’ नावाने मारते हाक
त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले, यापुढे महापालिकेचं मैदान, लोकसभेचे असो किंवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार. त्यामुळे सर्व राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं (wrestling) खिलाडूवृत्ती शिकावी. असं यावेळी सामंत म्हणाले आहेत.