कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. कांदा विकून शेतकऱ्यांना फक्त १ रुपया मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहील आहे. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
ठाकरेंच्या अडचणीत वाढ! आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राऊतांना समन्स
दरम्यान, या अनुदानाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. सरकारने 30 दिवसात हे अनुदान वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी लॉजवर टाकली धाड सापडली कॉलेजची मुलगी; समोर आलेली माहिती वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे –
शेतकऱ्याने कांदा विकलेली पावती
सातबारा उतारा
बचत खाते पासबुक
हे सर्व कागदपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
मुंबई लोकलमध्ये जोडप्याने सर्वांसमोर केलं किस अन् व्हिडीओ झाला व्हायरल; पाहा Video