चीनची (China) राजधानी बीजिंग (Bijing) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. चांगफेंग असे या हॉस्पिटलचे नाव आहे. आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दुपारी १२:५१ वाजता ही घटना घडली आहे.
सरकार कोसळणार? फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटनं उडाली खळबळ
या ठिकाणी आग लागलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यु टीमने भरपूर प्रयत्न केले. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत ७१ जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. रेस्क्यु टीम घटनास्थळी पोहोचताच त्यांनी २१ गंभीर जखमी लोकांना बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने या लोकांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
बिग ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब; दैनिक ‘सामना’तील नेमका दावा काय?
या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान चीनमध्ये आग लागण्याची आणखी एक घटना घडली आहे. जिन्हुआ ( Jinhu शहरातील एका कारखान्यात आग लागली आहे. दुपारी २वाजता ही आग लागली होती. यामध्ये तब्बल ११ जणांचा म्रुत्यु झाला आहे.
“गौतमीचा तो व्हिडीओ व्हायरल अन् नेटकरी म्हणाले… ” पाहा Video