कोरोनानंतर (Corona) राज्यात मागच्या काही दिवसापासून लम्पीने धुमाकूळ घातला आहे. राज्यात लम्पीमुळे आत्तापर्यंत २८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) दिलेल्या माहितीनुसार १७ डिसेंबरपर्यंत राज्यामधील ३५ जिल्ह्यांतील ४०५१ केंद्रांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग झाला आहे.
घाटेअळीला वेळीच टाळा, अन्यथा हरभऱ्याचे होऊ शकते नुकसान; ‘असे’ करा उपाय
लम्पी (Lumpy) आटोक्यात आला असल्याची माहिती येत होती परंतु मागच्या महिनाभरापासून राज्यात रोज सरासरी ३०० जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू होताना झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने याबाबत माहिती देखील दिली आहे. लम्पीने धुमाकूळ घातल्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत दिसत आहे. सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी पशुपालकांकडून मागणी देखील होत आहे.
पशुपालनाला महागाईचा झटका; उत्पादकांची चिंता वाढली …
दरम्यान लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना सरकारने (Govt) मदत करणार असल्याची घोषणा देखील केली होती. त्यानुसार १७ डिसेंबपर्यंत १५,५४३ जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी (Compensation) १४६१४ शेतकऱ्यांच्या (farmer) खात्यांवर ३८.८७ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
सोयाबीन पासून गुलाबजाम बनवण्याचा अनोखा फंडा! शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्यता