सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नेपाळमधील (Nepal) पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pokhara International Airport) 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. सध्या बचावकार्य सुरू असून विमानतळ बंद आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजलेले नाही.
‘महिलांनो दोनच अपत्यावर थांबा, उगाच पलटण वाढवू नका’; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताबाबत माहिती देताना एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला (Sudarshan Bertaula) यांनी सांगितले की, विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पुन्हा गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या अपघातांनंतर पोखरा विमानतळावर नेपाळ सरकारने (Government of Nepal) मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पंतप्रधान दहल यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. घटनास्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
धक्कदायक! नायलॉन मांजामुळे दहा वर्षीय चिमुरडी गळा कापल्याने गंभीर जखमी