मुंबई : उसाचा गळीत हंगाम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. याच पार्शवभूमीवर ऊस उत्पादकांसाठी एक दिलासदायक बातमी समोर येत आहे. सध्या ३५ कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊसाचे गाळप सुरू करण्याची परवानगी घेतलीये. हंगाम २०२१-२२ मध्ये १३७ लाख टन साखर उत्पादन (sugar production) करण्यात आले होते. मात्र यावर्षी राज्यामध्ये साखरेचे उत्पादन १ लाख टनाने वाढण्याची शक्यता वर्वतली जात आहे.
सरकारचा महत्वाचा निर्णय! देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार; वाचा सविस्तर
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) एकूण २४६ साखर कारखाने असून त्यापैकी २०३ कारखाने यंदाच्या, २०२२-२३ च्या हंगामात गाळप सत्रात सुरू राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचे ऊस शिल्लक राहिले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे आता यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारखाने सुरु होण्याच्या तयारीत आहेत.
ट्रॅक्टर पलटून ३ महिलांचा मृत्यू तर ५ महिला गंभीर जखमी
मागच्या वर्षी ऊस (sugar cane) शिल्लक राहून बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला. पण यासरशी असं काही होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे. दरम्यान राज्यामध्ये यंदाच्या वर्षी ऊस गाळप १,४१३ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खुशखबर! जमीन खरेदीसाठी मिळतंय शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर