Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड

Big news! 500 rupees fine to the owner if the dog fouls in public place

आता एक सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे. जर सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्याने घाण केली तर त्याच्या मालकाकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईला महापालिका (Municipality) प्रशासनाने सुरवात केली आहे. शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळले जात आहेत. याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

श्री सद्गुरु बजरंग बाबा महाराज स्वरूप सेवा योग विद्या केंद्राचे प्रस्थान आळंदीकडे

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर, उद्यानामध्ये (garden) पाळीव प्राणी घाण करत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे (Administration) सातत्याने येत आहेत. या कारणामुळे पाळीव प्राण्यांचे मालक आणि नागरिक यांच्यामध्ये सतत भांडण देखील होत असतात. या सर्व गोष्टीला आळा बसण्यासाठी पाळीव प्राण्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणारं पीएम किसानचा 13वा हप्ता; वाचा सविस्तर

त्यामुळे जर पाळीव प्राण्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर मालकाकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याची सर्व जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर (Health Inspector) सोपविण्यात आलेली आहे.

ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार; ट्विट करत केलं स्पष्ट

Spread the love
Exit mobile version