Site icon e लोकहित | Marathi News

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता

Big news! 8 people drowned in flood during Durga Visarjan while 40 people went missing

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जलपायगुडीतील माल नदीत दुर्गा विसर्जनादरम्यान (Durga Visarjan) मोठी दुर्घटना घडलीय. घडल असं की, माल नदीला (maal river) विसर्जनादरम्यान अचानक पूर (flood) आला. दरम्यान या पुरामुळं 8 जणांचा मृत्यू (death) झाला आहे. तर 30-40 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. तसेच अनेक जण अजूनही नदीत अडकून पडले आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफ टीमचे रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. जलपायगुडीचे एसपी देवर्षी दत्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की,अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो.

Shrigonda: श्रीगोंद्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, समोर आल धक्कादायक कारण; वाचा सविस्तर

नेमकी घटना कशी घडली?

पश्चिम बंगालमध्ये काल सायंकाळी विधिवत विसर्जनासाठी दुर्गा मातेची मूर्ती नदी किनारी आणण्यात आली. दरम्यान यावेळी नदीत पात्रातील पाणी कमी होते. म्हणून मूर्तीचं विसर्जन व्यवस्थित व्हावं यासाठी लोकांनी मूर्ती थोडी मध्यभागी नेण्याचा निर्णय घेतला. यासाठी अनेक महिला व पुरुषांनी नदीच्या पाण्यात उभे राहून माता दुर्गाला निरोप दिला. दरम्यान दुर्गा विसर्जनाच्यावेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले.

Eknath Shinde: शिंदेंचे भाषण सुरू असताना निम्म्यापेक्षा जास्त लोक निघून गेले

या घटनेची माहिती मिळताच खळबळ उडाली. दरम्यान लोक पाण्यात वाहून जाऊ लागली. यावेळी जीव वाचवण्यासाठी लोकांनी आरडाओरडा सुरु केला. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं विसर्जनाचा कार्यक्रम तत्काळ थांबवला. दरम्यान त्यानंतर एनडीआरएफच्या टीमने लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. या अपघातात 8 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर 10 जखमींना वाचवण्यात यश आल असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अजूनही बचाव कार्य सुरुच आहे.खरतर पश्चिम बंगालमधील माल या नदीचा उगम भूतानमधून होतो. पण त्याचं पाणी हे भारतात येतं.

मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी

Spread the love
Exit mobile version