मोठी बातमी! रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Big news! A case has been filed against Ramdev Baba

योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांनी ‘महिलांनी कपडे घातले नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात’, असे विधान केले होते. यामुळे ते मोठ्या वादात अडकले होते. दरम्यान रामदेव बाबांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”

राजस्थानमधील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांची ( Religion) तुलना केली. मात्र यावेळी त्यांनी मुस्लीम धर्मीयांबद्दल केलेले विधान वादात सापडले आहे. ” इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे इतकाच आहे. या धर्मात ५ वेळा नमाज पठण केल्यानंतर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या किंवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा.” असे म्हणत त्यांनी मुस्लिम धर्माचा अपमान केला आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट

याशिवाय इस्लाम (Islam) धर्मात पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. असे देखील रामदेव बाबा या कार्यक्रमात म्हणाले. इतकंच नाही तर यावेळी त्यांनी ख्रिश्चन धर्माला देखील कमी लेखले आहे.

शरद पवारांनी ‘ते’ विधान करताच सभागृहात पिकला हशा! थेट इंदुरीकर महाराजांनाच केले टार्गेट

या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिसांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात काल (दि.5) गुन्हा दाखल केला आहे. अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे आणि धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे या आरोपांखाली रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *