केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ( Shivsena) पक्षाचा दावा व धनुष्यबाण चिन्ह नुकतेच शिंदे गटाला दिले आहे. यामुळे बसलेल्या धक्क्यातून ठाकरे गट सावरतोय तोच त्यांच्यासमोर नवीन अडचणी उभ्या राहत आहेत. मागच्या 60 दशकांचे हातातून निसटलेले नाव, समता पार्टीने मशाल चिन्हावर केलेला दावा आणि आता ठाकरे गटातील एका बड्या नेत्यावर दाखल झालेला गुन्हा ! यामुळे ठाकरे गटाची ( Thackeray Group) अवस्था बिकट झाली आहे.
पोलीस भरतीमध्ये धावता धावता तरुणाचा मृत्यु! वयाच्या 26 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास
त्याच झालंय असं की, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेला प्रतिउत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकची हिंद केसरी थाळी राज्यात प्रसिद्ध; आस्वाद घेण्यासाठी होते खवय्यांची गर्दी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे. असे मत शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याने ठाकरे गटासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
“…म्हणून अमित शाहांनी कसबा चिंचवड मध्ये प्रचार केला नाही; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट चर्चेत