मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Big news! A case has been registered against MP Sanjay Raut

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राजकारणात कायम सक्रिय असतात. संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राऊतांविरोधात ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

“लग्न कधी करणार?”, प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण सध्या…”

नेमकं काय म्हणाले होते राऊत?

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. या पात्रात त्यांनी म्हंटल आहे की, “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सतांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात.”

त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, “तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.” असे पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.

“शरद पवार यांना फडणवीसांची भीती वाटत होती”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठं वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *