राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता शाईफेक करणाऱ्या व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर; सोशल मीडियावर होतोय ट्रोल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज भास्कर घरबडे, विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय भाऊसाहेब इजगज या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे.
धक्कादायक! सहलीला निघालेल्या विदयार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.
शिक्षण मंत्र्यांना असं बोलणं शोभत का? चंद्रकांत पाटलांची सुद्धा तावडेंसारखी अवस्था होऊ शकते!