मोठी बातमी! ऊस बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

Big news! A case will be filed against the factory director who exhausts sugarcane bills; Read in detail

महाराष्ट्रात सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक याबाबद्दल विविध स्तरांतून चर्चा होत आहेत. या दरम्यान उत्तरप्रदेश मधून याबाबतच एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील न्यौली साखर कारखान्याकडे ( Nauly Sugar industry ) जवळपास 35 कोटींची थकबाकी आहे.

अब्दुल सत्तार यांच्याकडून शिवराळ भाषेत सुप्रिया सुळेंवर टीका; राष्ट्रवादी आक्रमक

या कारखान्याने अजूनही शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर सरकारने वारंवार निर्देश दिल्यानंतरही कारखान्याने अजूनही ऊस बिले दिलेली नाहीत. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये या कारखान्याकडे ऊस बिलाची ३५.३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय कारखान्याकडे ८२.२२ लाख रुपये ऊस विकास अनुदानही थकीत आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासंबंधित विविध समस्या सोडवण्यासाठी राहुल कुल यांनी घेतली केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरिंची भेट

यामुळे तेथील प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून न्यौली साखर कारखान्याला नोटिसा देखील बजावल्या आहेत. परंतु, तरी देखील कारखान्याने याची दखल घेतली नाही. म्हणून प्रशासनाने आता या कारखान्याविरुद्ध कारवाई केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी हर्षिता माथूर ( Harshita Mathur) यांनी निर्देश दिले होते.

दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..

या कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापन विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत सोरोंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या एका वाहतूकदाराचा खून; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *