विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात रॅगिंग प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रॅगिंग चे प्रकार सर्रास कॉलेजेस मध्ये घडतात. रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाणही वाढत चालले आहे. असाच एक प्रकार मराठवाडा मित्र मंडळाच्या (Marathvada Mitra Mandal) कॉलेजमध्ये घडला आहे. रॅगिंगला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमध्ये तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पंढरपूर आषाढी यात्रेसाठी पाच हजार बसेस सोडणार
राज रावसाहेब गर्जे (वय २२, रा. गोखलेनगर, मुळ रा. पाटसरा ता. आष्टी, जि. बिड) असे आत्महत्या करणार्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निरूपम जोशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राज याचे वडिल रावसाहेब गर्जे यांनी तक्रार दिलेली आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत.
Gautami Patil । बार्शीत गुन्हा दाखल होताच गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी फक्त…”