केरळमधील एक ट्रान्सजेंडर कपल (Transgender couple from kerala) मागील काही दिवसांत चांगलेच चर्चेत आहे. केरळमधील जिया आणि जहाद या ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. याबाबत स्वतः ट्रान्सजेंडर जोडप्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जहादनं एका सरकारी रुग्णालयामध्ये गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
तब्बल दोन वर्षानंतर एम.एस.धोनीचे कमबॅक; चाहते सुद्धा झाले हैराण
दरम्यान, केरळच्या कोझिकोडमध्ये हे ट्रान्सजेंडर कपल आहे. जिया आणि जिहाद हे मागील तीन वर्षांपासून रिलेशनशीप मध्ये आहेत. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मागच्या काही दिवसापूर्वी तिच्या प्रेग्नेंसीचे फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. ” मी जन्मापासून महिला नाही. मात्र मी आई होण्याचे स्वप्नं पाहिले होते. एखाद्या मुलाने मला आई म्हणून हाक मारावी अशी माझी खूप इच्छा होती.” असे तिने या पोस्ट मध्ये लिहिले होते.
धक्कदायक! बाप दररोज दारू प्यायचा म्हणून बापाला कंटाळून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचीच हत्या केली
तसेच मागील तीन वर्षांपासून मी व जिहाद एकत्र आहोत. आता जिहादचे व माझे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सध्या जिहादच्या पोटात आमचे आठ महिन्यांचे बाळ आहे. असे देखील जियाने आपल्या पोस्ट मध्ये सांगितले होते. आता सध्या त्यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!