
मुंबई : मुंबईतील (Mumbai) बोरीवलीतील (Borivali) साईबाबा नगरमधील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. इमारत कोसळल्यावर त्याखाली काहीजण अडकले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच या इमारतीमध्ये काही कुटुंब देखील राहत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यभरात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरु आहे. त्यामध्येच आता बोरिवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १२:४५ च्या दरम्यान इमारत कोसळत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि त्याचबरोबर पोलीस पथकही दाखल झाले आहे.
माहितीनुसार, इमारती शेजारी फुटपाथवर बसलेले काही लोक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. ही इमारत धोकादायक असल्यामुळे आधीच पालिकेच्या विभाग कार्यालयाने ती रिकामी केली होती. पण तरीही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू आहे.