
नव्या वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी नाशिक येथे एका कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कंपनीचे नुकसान तर झालेच आहे. परंतु, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार देखील जखमी झाले आहेत. ही आग लागली कशी ? याचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही.
संजय राऊत यांचे मोठे भाकीत; नवीन वर्षात सरकार घरी बसणार?
इगतपुरी येथील जिंदाल ( Jindal) नामक कंपनीला आज ( दि.1) दुपारी भीषण आग लागली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. या कंपनीत केमिकल्स देखील असल्याने केमिकल्स चे स्फोट होत आहेत. यामुळे आग आटोक्यात आणणे अवघड झाले आहे.
बोगस रेशनकार्ड बनवणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल…
कंपनीच्या आतल्या भागात ज्या ठिकाणी आग लागली आहे. तेथे केमिकल्स च्या स्फोटांचा आवाज येत आहे. सोबतच काही कामगार देखील तिथेच असल्याची माहिती समोर येत आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत.