काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात येऊन आठ दिवस उलटले आहेत. यावेळी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सावरकरांबाबत एक विधान केले आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले सावरकर हे ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते. त्यांचे हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. आता याप्रकरणी त्यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यात ऊसतोड कामगाराच्या ३ वर्षीय चीमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला…
‘शिवसेना’ (Shiv Sena) पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींनी सावरकरांविरोधातील केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या (local citizens) भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप वंदना डोंगरे यांनी केला आहे. त्यांना शिंदेगटाने (Shindegat) देखील पाठिंबा दर्शवलाय.
बिग ब्रेकिंग! मंत्रालयामध्ये तरुणाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न; नेमकं काय असेल कारण?
दरम्यान, राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाकडून ठाण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राहुल गांधींविरोधात गुन्हा (crime) दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली.
“राहुल गांधींचा विचार गाडल्याशिवाय राहणार नाही” – देवेंद्र फडणवीस