नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) स्कुल व्हॅन नाल्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅनमध्ये विद्यार्थी देखील होते. मात्र थोडक्यात या व्हॅनमधील विद्यार्थी सुखरुप आहेत. नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्यावर व्हॅनचा हा अपघात (School Van Accident) झाला आणि व्हॅन नाल्या्चया किनाऱ्यावर गेली. या अपघातामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. तर बाकी सर्व मूल सुखरूप आहेत.अपघातस्थळी पोलीस पोहचले असून पुढील कारवाई चालू आहे.
व्हॅनचं स्टेअरींग लॉक झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा प्रश्नही पुन्हा एकदा हायलाईट झाला आहे.
जे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते त्यांना लवकरात लवकर रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दरम्यान, पोदार शाळेही ही व्हॅन असल्याचं माहिती येत आहे. तर नाल्यात उलटलेल्या व्हॅनवर रोहन उच्च प्राथमिक विद्यालय असं लिहिल्याचं दिसून आले आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी वाहनं किती सुरक्षित आहेत, यावरुही आता शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. आता पालक विद्यार्थ्यांना व्हॅनमधून शाळेसाठी पाठवण्यास देखील घाबरत आहेत.