सध्याच्या उन्हाळ्यात उष्माघातामुळे काही लोकांचे मृत्यू होत आहे. तर काही लोकांना उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येतोय. व अशा वातावरणामध्येच अचानक वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता तज्ञांनी सांगितली आहे. पुढील दोन-तीन दिवसात वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण येथे उष्णतेची लाट तशीच कायम राहणार आहे.
धमक होती तर नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला असून मान्सून पुढे सरकत आहे. व कालपासून मान्सूनने बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केली आहे. मान्सून बंगालचा सागर पार करुन कर्नाटकात पोहोचण्यास सात दिवसांचा कालवधी लागेल असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून पुढे सरकत आहे अशी माहिती दिली आहे.
ब्रेकिंग! ‘या’ महिन्यामध्ये होणार लोकसभा निवडणुका; कोणी दिले संकेत?
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या ठिकाणी उष्णता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. कोकणात देखील कडक उन्हाळा पाहायला मिळणार आहे. विदर्भात 22 ते 24 मे मध्ये पाऊस होणार असून उर्वरित राज्यात उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवेल. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्याने पावसाची शक्यता सांगितली आहे.
दररोज बडीशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचून व्हाल थक्क
मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होणार आहे. परंतु यावर्षी मान्सून तीन दिवस अगोदरच दाखल झाला आहे. शुक्रवारी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल पुढच्या दिशेने सुरू आहे. व शनिवारी बंगालचा उपसागर व्यापण्यास सुरुवात केली आहे. बंगालचा उपसागर विस्तीर्ण असल्याने तो पूर्ण पार करण्यास मान्सूनला आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर मान्सून कर्नाटककडे दाखल होईल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत सलमान खान बांधणार 19 मजली आलिशान हॉटेल, काय काय असेल यात? वाचा सविस्तर