सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात अमरावतीमध्ये झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हिरव्या मतांसाठी उद्धव ठाकरे गप्प आहेत; आशिष शेलार यांचा हल्लाबोल
डोक्याबरोबर आमदार बच्चू कडू यांचा अपघातामध्ये उजव्या पायाला देखील दुखापत झाली आहे. बच्चू कडू रस्ता ओलंडताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नासाठी नवरी शोधा म्हणून शेतकरी पुत्राने केला थेट आमदारांना फोन!
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला इजा झाली आहे.
एक वक्तव्य आणि नितीश कुमार परत अडकले; म्हणाले, “आम्ही पुरुष रोज लैंगिक संबंध ठेवतो परंतु,..”