अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी पुणे बंगळुरु (Pune-Bangalore Highway) महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करत होते. त्यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे बेंगलोर महामार्गाचे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरु आहे त्यामुळे त्या ठिकाणची झाडे वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवानी यामध्ये त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. “मला कोणतीही दुखापत झालेली नाही मी सुखरूप आहे”,अशी माहिती स्वतः सयाजी शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
अन् शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो फेकून दिले; कवडीमोल दरामुळे उत्पादक वर्ग चिंतेत!
दरम्यान, सयाजी शिंदे हे ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटण्यास येणार आहेत. सयाजी शिंदे यांच्यासोबतच नागराज मंजुळे, आणि आकाश ठोसर हे देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर