
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ८:४० वाजता त्यांचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. माहितीनुसार, आज दुपारी३.४० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मुकेश अंबानींच्या कुटुंबामध्ये कोण जास्त शिकलंय? वाचा सविस्तर…
स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांच्या अचानक जाण्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबावर देखील शोककळा पसरली आहे.
होळीच्या दिवशी अश्लीलवर्तन झाल्यावर जपानी तरुणीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…
स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांच्या मृत्यूची माहिती माधुरी दीक्षितच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्याचबरोबर माधुरी दीक्षितने देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, माझी प्रिय आई स्नेहलता यांचं आज सकाळी निधन झालं आहे. आज त्यांच्या पार्थिवावर आज मुंबई या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे.