सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री राखी सावंतची आई जया यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. राखी सावंत हिच्या आईला ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने असे दोन आजार होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार देखील चालू होते मात्र त्यांनी काल संध्याकाळी शेवटचा श्वास घेतला आहे.
के एल राहुलने शेअर केले हळदीचे फोटो; पाहा PHOTO
जया यांच्यावर मुंबईमधील टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता. मात्र काल रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. आदिल दुर्रानीने जया यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ होणार?
नुकतंच राखी सावंतने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “आई आता या जगात नाही. मागच्या काही दिवसांपासून ती गंभीर आजाराशी लढत आहे. शेवटी आज तिचे सर्व अवयव निकामी होत गेले आणि तिचे निधन झाले.”असं राखी म्हणाली. यावेळी माध्यमांशी बोलताना राखीला अश्रू अनावर झाले.
लग्नानंतर चारच दिवसात के एल राहूलने दिली मोठी गुडन्यूज; चाहते व पत्नी देखील झाले खुश