‘बिग बॉस विजेती टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या (‘Bigg Boss winner TV actress Urvashi Dholakia) कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शाळकरी मुलांच्या स्कुलबसने धडक दिल्याने हा गंभीर अपघात झाला आहे. उर्वशी मुंबईतील (Mumbai) एका स्टुडिओमध्ये जात असताना हा अपघात झाला आहे.
‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्वशीला एका स्कुल बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही इजा झाली नाही. याबाबत उर्वशीने पोलिसांत कोणतीही तक्रार देखील दाखल केली नाही कारण तिच्या मते हा फक्त अपघात होता.
तुम्ही बंडखोरी करताना कोणाला सांगितलं? राम शिंदे यांचा अजित पवारांना सवाल
उर्वशी ढोलकिया मुंबईतील मीरा रोडवर असणाऱ्या स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी तिच्या टीमसोबत चालली होती यावेळी हा अपघात झाला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत