हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी (Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अन् गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतली काठी, पुढे काय झाले हे वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी चांगलेच आपटले आहेत. आता ते थेट 21 व्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कपात होत असून रोज नवीन धक्क्यांना ते सामोरे जात आहेत. अशातच त्यांना आणखी एक जबरदस्त धक्का मिळाला आहे.
ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी येणार नवा पाहुणा; लवकरच होणार आई-बाबा
शेअर मार्केट मध्ये कधीकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या अदानी एंटरप्राईझेसला अमेरिकन शेअर मार्केट डॉ जॉन्समधून काढण्यात आले आहे. या निर्णयानंतर भारतात देखील अदानी एंटरप्राईझेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला आहे. यामुळे अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होत आहे. इतकंच नाही तर अदानी पोर्टमध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
अरे बापरे! एकाच व्यक्तीच्या १२ बायका आणि १०२ मुलं, वाचा या अनोख्या कुटुंबाबद्दल माहिती
याशिवाय आता अदानी ग्रीन एनर्जी व अदानी टोटल गॅसचा शेअरही लोअर सर्किटवर आला आहे. अमेरिकन शेअर बाजाराने मोठा निर्णत घेत, अदानी एंटरप्राईझेसला डॉ जॉन्सच्या सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यामुळे येत्या ७ फेब्रुवारीपासून त्याला त्या इंडेक्समधून काढून टाकण्यात येणार आहे. अदानींचे वाढते नुकसान पाहता NSE ने अदानी पोर्टच्या एफ अँड ओ स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे.