मोठी बातमी! आदिल खान दुर्रानीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात, राखीने दाखल केली तक्रार

Big news! Adil Khan Durrani was detained by Mumbai police, Rakhi filed a complaint

सध्या राखी सावंत सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर (Adil Khan) गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. दरम्यान राखीने आदिल खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता राखीच्या तक्रारीची दखल मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी घेतली असून आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचितची उडी; बंडखोर राहुल कलाटे यांना आंबेडकरांचा पाठिंबा? चर्चांना उधाण

राखीने काही दिवसांपूर्वी आपला बॉयफ्रेंड आदिल खान ( Adil Khan) याच्यासोबत कोर्टात लग्न केले. यावेळी लग्नानंतर तिने आपला धर्म बदलून फातिमा असे नाव ठेवले. सुरुवातीच्या काळात आदिल खान आपल्या लग्नावर व कोर्टमॅरेज वर मौन बाळगून होता. परंतु, काही दिवसांनी आदिल खानने देखील या लग्नाला होकार दिला होता.

“स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर…”, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे जितेंद्र आव्हाडांवर टीकास्र!

आता लग्नानंतर लगेच काही दिवसातच राखीने पतीवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आदिलला पोलिसांनी नेमक्या कोणत्या कारणाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राखी आदिल खानवर गंभीर आरोप करत आहे. आता राखीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

‘आय एम सॉरी…लव्ह यू मम्मी’ म्हणत बारावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *