अभिनेत्री राखी सावंत ( Rakhi Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिगबॉस मराठी मधून बाहेर पडल्यापासून राखी एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत आहे. एकीकडे तिची आई गंभीर आजाराने त्रस्त होती. तर दुसरीकडे तिचे लग्न धोक्यात आले आहे. ब्रेन ट्युमर व कॅन्सर सारख्या आजारांनी नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले. दरम्यान राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने धक्कादायक माहिती दिली आहे.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही; बोर्डाने दिले आदेश
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखीने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत म्हणाली आहे.
“हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करावा” – बच्चू कडू
दरम्यान मागच्या एका व्हिडीओमध्ये राखी सावंत रडत असून तिने आपले लग्न धोक्यात असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर ती तीव्र नैराश्यात असल्याचे देखील राखीने सांगितले आहे. पापाराझींनी नुकतेच राखी सावंतला मुंबई येथे पाहिले होते. यावेळी ती म्हणाली की, ” माझे लग्न धोक्यात आहे. मला माझे लग्न ( Marriage) वाचवायचे आहे. माझ्यावर अत्याचार करू नका, देवा मला मारून टाक” इतकंच नाही तर या व्हिडीओ मध्ये राखी सावंत जोरजोरात किंचाळत आहे.
अर्थसंकल्प जाहिर होताच अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”
राखीने काही दिवसांपूर्वी आपला बॉयफ्रेंड आदिल खान ( Adil Khan) यांच्यासोबत कोर्टात लग्न केले. यावेळी लग्नानंतर तिने आपला धर्म बदलून फातिमा असे नाव ठेवले. सुरुवातीच्या काळात आदिल खान आपल्या लग्नावर व कोर्टमॅरेज वर मौन बाळगून होता. परंतु, काही दिवसांनी आदिल खानने देखील या लग्नाला होकार दिला होता.
ऊसतोड मजूर नवरा-बायको रातोरात इंस्टाग्रामवर झाले स्टार; मात्र प्रसिद्धीमुळे ओढवलं संकटं