अभिनेत्री राखी सावंत ( Rakhi Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिगबॉस मराठी मधून बाहेर पडल्यापासून राखी एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत आहे. एकीकडे तिची आई गंभीर आजाराने त्रस्त होती. तर दुसरीकडे तिचे लग्न धोक्यात आले आहे. ब्रेन ट्युमर व कॅन्सर सारख्या आजारांनी नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले आहे.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राज ठाकरे भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले…
मागच्या काही दिवसापूर्वी राखीने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत म्हणाली आहे. दरम्यान आता राखीने त्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार आदिल खानच्याच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असे आहे.
मोठी मुलगी पायलट तर आता अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचीही कौतुकास्पद कामगिरी, म्हणाल्या…
सध्या आदिल आणि तनुचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये आदिल हा एका मुलीबरोबर पाहायला मिळत आहे. ही मुलगी तनु असल्याचे म्हटलं जात आहे. तनु ३७ वर्षांची असून ती एक बिझनेसवुमन असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान आदिल आणि तनु यांचे अफेअर आहे की नाही? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.