यंदाचे हिवाळी अधिवेशन दिशा सालीयन ( Disha Saliyan) प्रकरण चांगलेच गाजले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर या अधिवेशनामध्ये गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
बारामती मधील डॉक्टरांवर गंभीर आरोप; हलगर्जीपणा केल्याने बाळाचा मृत्यु झाल्याने कारवाईची मागणी
दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वारंवार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray) यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे आज नाहीतर उद्या त्यांना तुरुंगात जावे लागेल. या प्रकरणातून त्यांची सुटका होणे अवघड आहे. असे म्हणत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना इशारा दिला आहे.
‘या’ मोठ्या कंपनीने केली दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ
“दिशा सालियन ही महाराष्ट्राची कन्या होती, तुम्ही तिच्यावर अत्याचार केले, तिची हत्या केली. इतकच नाही तर खुनाच्या ठिकाणी तू देखील हजर होतास. यामुळेच तुम्हाला सोडले जाणार नाही. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे.” असे देखील नारायण राणे यावेळी म्हणाले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला दिले आहेत.
कांद्याचे दर वाढले! शेतकऱ्यांसाठी आनंद तर ग्राहकांच्या खिशाला कात्री