सध्या दूध भेसळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी केमिकल पावडर वापरून दूध बनविले जाते. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी देखील दूध भेसळीचे प्रमाण वाढले होते. याच पार्शवभूमीवर अन्न औषध प्रशासनाने धाड टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश केला होता. श्रीगोंदा तालुक्यामध्ये दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलित केले जाते. मात्र दुध अन्न औषध प्रशासनाने भेसळीचा पर्दाफाश केल्यानंतर आता तालुक्यात ५० ते ६० हजार दूध संकलन होऊ लागले आहे.
हृदय पिळवून टाकणारी घटना! आईने ४ मुलांसह विहिरीत घेतली उडी; नंतर स्वतः बाहेर आली, मात्र मुलांना…
दूध भेसळ प्रकरणी अन्य औषध प्रशासनाने छापा टाकून १० आरोपींना अटक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपी फरार आहेत.
अभिनेत्री अलका कुबल यांचा ‘तो’ फोटो व्हायरल; पाहा Photo
या कारवाईननंतर श्रीगोंद्यामध्ये दिवसाला १ लाख लिटर बोगस दूध संकलन होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
थंड पाण्यात पोहणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या संशोधकाचं मत