कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची काल संध्याकाळी 5 वाजता सांगता झाली. पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धावपळ आणि गोंधळ आता थांबला आहे. दरम्यान कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
धनुष महिन्याला कमावतो ‘इतके’ कोटी रुपये, वाचा त्याच्या संपत्तीविषयी सविस्तर माहिती
याचा निषेध करण्यासाठी रविंद्र धंगेकर आज (ता.25 ) कसबा गणपतीसमोर उपोषणाची बसले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपने पैशाचे वाटप सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी आहेत असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला होता. तब्बल ५ तास उपोषणाला बसल्यानंतर आता आता धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले आहे.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला आवडतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता; स्वतःच केला याबाबत खुलासा
दरम्यान, आज सकाळी 10 वाजता रविंद्र धंगेकरांच्या उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात झाली होती. यासाठी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.
देशातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य