सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चित्रपट शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर हैद्राबाद मध्ये प्राथमिक उपचार करून आता त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं आहे.
नाद करा पण आमचा कुठं! ट्रॅक्टरने नव्हे तर महिंद्र THAR ने नांगरले शेत; लोक म्हणाले…
याबाबत माहिती अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर शेअर केली आहे. त्यांनी ब्लॉगवर हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी आराम करत आहेत. त्यांनी ही माहिती शेअर करताच चाहत्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे.
बिबट्याची दहशद! थेट घरात घुसला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
त्याचबरोबर ‘दुखापतीमुळे काम थांबवले असल्याचे देखील अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर मी जलसामध्ये विश्रांती घेत असून कामासाठी मोबाईलचा वापर करत आहे. मला आज संध्याकाळी जलसा गेटवर हितचिंतकांना भेटता येणार नाही. त्यामुळे कृपया येऊ नका. असं देखील यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.
“भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल