मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 14’ या सेटवर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या पायाची नस कापली गेली आहे. यामुळे त्यांना लवकरात लवकर तेथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे आहे.
Urfi Javed: उर्फीने चक्क फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस केला परिधान, पाहा VIDEO
याबद्दल अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. यावेळी दुखापत नेमकी कशी झाली याबद्दल अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, धातूच्या धारदार वस्तूने त्यांच्या डाव्या पायाचा मागचा भाग कापला, त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामूळे त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्यात आले, त्याचबरोबर त्यांच्या पायाला टाके देखील पडले आहेत.
रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल
आता अमिताभ बच्चन यांची तब्बेत ठीक असून त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितला आहे. त्यांना पायावर भर देण्यास किंवा चालण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यांच्या या अपघातामुळे त्यांचे चाहते चांगलेच घाबरले आहेत. अमिताभ बच्चन यांनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.
वीर जवानांनी देशाच्या सीमेवर साजरी केली दिवाळी, जनतेला दिला अभिमानास्पद संदेश