सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींखाली अटक करण्यात आली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्ही. सेंथिलला आज विशेष न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
मोठ्या बदलांसह हिरोची पॅशन प्लस लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बुधवारी ईडीने बालाजी यांना वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईच्या ओमंडुरार सरकारी रुग्णालयात आणले. रुग्णालयाबाहेरील दृश्य हाय व्होल्टेज ड्रामाने भरलेले होते. बालाजी हे वाहनाच्या आत वेदनेने रडताना दिसले, तर त्यांचे समर्थक तपास संस्थेच्या विरोधात घोषणा देत बाहेर उभे होते.
मोठी बातमी! बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका पाहता गुजरातने 30,000 लोकांना पाठवलं सुरक्षित स्थळी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून तामिळनाडूचे उर्जा मंत्री व्ही सेंथिल बालाजी आणि इतर काहींच्या जागेवर छापे टाकले.
Video | उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुला काही…”